Thursday, 11 August 2016

मन हे....!

मन हे.....
© चंद्रहास।

कधी चकचकीत कधी चकित हे
कधी शंकित कधी आतंकित हे।
बावरे हे मन कधी अवचित हे
कधी पुलकित कधी गंधित हे॥

कधी सुजाण असलेले मन हे
कधी शून्याचे वस्त्र लेवलेले हे।
कधी कोपाचे शस्त्र धरलेले हे
कधी स्नेहाचे बंध असलेले हे॥

कधी मायेची पाखरण मन हे
कधी मोराच्या पिसा-या सम हे।
कधी एकाच मोरपीसा सम हे
कधी अस्तित्वाचे खोटे भ्रम हे॥

कधी सुरेल तराणे गाताना हे
अवखळ दिसते भ्रमरासम हे।
कधी स्वप्नात रंग भरताना हे
विसरून जाते भान आपुले हे॥

दुःखाचे डोंगर पार करताना हे
गरूडा सम जरी भासलेले हे।
कधी अटल निश्चलसे तरीही
हिमनगासम मृदु कोमलसे हे॥

कधी अथांग सागरासमान जरी
उसळत्या लाटांसह असलेले हे।
क्षणात सुस्थिर आकाशासम हे
समोर येते लेऊन वस्त्र ता-यांचे॥

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...