Friday, 31 March 2023

मनोज्ञा

 


🟣 शाॅपिजेननं प्रकाशित केलाय, रसिकजनांच्या मनाचा ठाव घेणारा काव्यसंग्रह "मनोज्ञा." 

तुमचं वय कितीही असू द्या, या कविता तुमच्या समोर तुमच्या "जीवनातील वसंत" उभा करतील, हे नक्की! 🌸🌸

हा काव्यसंग्रह बुद्धीच्या समीक्षेचा भुकेला नाही, तर त्याला तुमची मनमुराद दाद हवीये. रसिकांच्या आनंदासाठीच तर या कवितांच्या कलिका संग्रहरूपात 💐 प्रकाशित केल्या आहेत. 

आहात ना तयार स्वागताला? "मनोज्ञा" येतेय, तुमच्या तरल आणि तरुण मनाचा ठाव घ्यायला! ❄️

आठवांचं मोरपीस, घनगर्द आभाळ, मनाला पक्षी होण्याची आस, समेवर आलेल्या श्रावणधारा, कधी व्यक्त तर कधी अव्यक्त असा अनुराग अशा कितीतरी लोभस भावनांचं चांदणं प्रकट करणारी या "हास-या चंद्राची" स्नेहल "मनोज्ञा" वाचायलाच हवी!

- मानसी, मनोज्ञाची संपादिका  📝

🦚🪷🦢

https://shopizen.app.link/vLj4Mr8Gyyb 

Sunday, 19 March 2023

या सुंदर वेळी...... हसरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)

 या सुंदर वेळी......
हसरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)




वसंतातही कधी येतो
पाऊस आठवांचा अवचित.
मृद्गंधाचाही धूप होतो
मोहोराच्या गंधाला लाजवित.

या सुंदर वेळी वेल डोलते
आंब्याच्या डहाळीवर जेव्हा.
हिंदोळा जणु घेते राधिका
सोबतीस असतो कान्हा तेव्हा.

मंथर वारा मनीचे गूज सांगतो
इतकेच मागणे सखयां मागतो.
तव पाव्यामधून जाऊ दे मला
कान्हा, तुझा सूर होऊ दे मला.

अंबरात सौदामिनी चमकते
प्रियेची दंतावली चकाकते.
तिचे भाबडे डोळे पाहून
कृष्णाची नजर एकवटते.

बरसान्याच्या दुहितेला पाहून
पाऊसही बरसणे विसरतो.
मनमोर मात्र पिसारा फुलवून
पुन्हा त्या पावसाला बोलावतो.

पाऊसही स्वीकारतो आमंत्रण
मग बहरून जातं ते वृंदावन.
प्रत्येकाच्या आठवणीत असतं
आपलं आपलं एक निधीवन.

सावली हासरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)

                सावली हासरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)

 

कातरवेळी सावली अशी दिसली कशी
सजणी दारी ऊभी तरी बोलली कशी

सावली ती हसली रुसली मुसमुसली
लाडी गोडी काॅफी तरीही रुसरुसली

रुसली तरी बोलली बोलली तरी रुसली
हसली तरी रुसली रुसली तरी हसली

सावली ती एकली खांबासी ऐसी टेकली
गोडी ती बरसली स्मरणी किणकिणली

ती वदली रसरसली फुलली हलली पिसारली
अंतरी हृदयी भरली भारली रमली सामावली

(या कवितेचे वैशिष्ट्य असे की, या कवितेतील प्रत्येक शब्द ईकारांत आहे.)

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...