Monday, 13 March 2017

रंग....! डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर

रंग....!
डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर

अजाणता रंग जाणता होतो
कधी जाणता अजाण होतो.
शहाणा रंग कधी बावरा होतो
कधी बावरा शहाणा होतो. ॥1॥

कधी रंग गंधित होतो
कधी गंध रंगीत होतो.
कधी रंग भ्रमित होतो
कधी गंध चित्रित होतो. ॥2॥

काळाचे ते कधी रंग वेगळे
रंगांचे आपुले स्वैर सोहळे,
स्मृतीगीतांचा सूर ओघळे
लाघव वेळी वेळ ना कळे. ॥3॥

कौतुकाचे रंग मनोहर
मत्सराचे दर्प भयंकर
मैतराचे रंग बहु सुन्दर
कातराची वेळ शुभंकर. ॥4॥

काय पश्चिम काय प्राचीचे
रंग समान स्वागत एकीचे
रंग असावे कोमल हास्याचे
कधी कधीच कौतुक नेकीचे. ॥5॥

रंगांची उधळण करू चला
रंग केसरीया उधळू चला
साथ देऊ साथ घेऊ चला
जीवनाचे चित्र सजवू चला. ॥6॥

Sunday, 5 March 2017

कवडसा असावा।

जगण्यात कवडसा असावा।
© चन्द्रहास सोनपेठकर

स्वप्न ऊरी असावे
स्वप्नासाठी जगावे।
स्वप्न जगणे व्हावे
जगणे स्वप्न न व्हावे॥

स्वप्नात दिवे असावे
जगण्यात उजेड असावा।
अंधारल्या रात्री स्वप्नावे
जगण्यात अंधार नसावा॥

स्वप्न आपलेच असावे
त्यात परकेपणा नसावा।
स्वप्नात हास्य असावे
जगण्यात कवडसा असावा॥
© चन्द्रहास सोनपेठकर

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...