Saturday, 13 August 2016

........ पाहिजे.

...... पाहिजे!
© चन्द्रहास सोनपेठकर

क्षितीजाच्या पलीकडेही असते आकाश,
शोधलं पाहिजे.
नेहमीच संधी असते विकासाची, प्रत्येकाला,
शोधली पाहिजे.

एखाद्या संकटाने संपत नसतो माणूस, कधीच,
सावरलं पाहिजे.
एखाद्या वादळाने स्वप्न जात नाही हरवून,
सापडलं पाहिजे.

माणूस चुकतो, माणूसकी नाही संपत जगातली,
जपली पाहिजे.
समस्या कितीही मोठी असली, निराकृत होते,
निराकारीली पाहिजे.

मोठ्या पराभवात सुद्धा असते जिंकण्याची संधी,
दिसली पाहिजे.
लहान सहान विजयात हरण्याची असते शक्यता,
कळली पाहिजे.

देव, दानव, संत काहीही होता येतं माणसाला,
ठरवलं पाहिजे.
पण त्या आधी माणसाला माणूस म्हणून जगणं,
जमलं पाहिजे.

जय श्रीकृष्ण।।

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...