Wednesday, 20 July 2016

--------------तरच, प्रशासक व्हायचं!

--------------तरच, प्रशासक व्हायचं!
 डॉ. चंद्रहास सोनपेठकर

कितीही आलं मनात राग
तरी त्याची आग होऊ देता येत नाही.

आपण कितीही हुशार असलो
तरी तसे म्हणण्याची मुभाच नाही.

सारेच सहकारी हुशार म्हणायचे
या समजूतदारीला कशी तोडच नाही.

बसण्याची खुर्ची दिसते हो सर्वाना
कामाचं टेबल पाहायला कुणाला वेळच नाही.

आपल्याला सर्वांचे सहकार्य हवे ना
कुणाला काही बोलण्याची बिषादचं नाही.

रोज रोज नवी ऊर्जा आणायची
काम पुढे रेटायचं थकायला वेळच नाही.

घेतलीये ना जबाबदारी बस आता
माघार घ्यायला दोरच शिल्लक नाही.

पुढेच जायचं, पुढेच न्यायचं तरच,
प्रशासक व्हायचं, थांबायचा प्रश्नच नाही.

जय श्रीकृष्ण!!!

2 comments:

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...