श्रावणसरी...
© चन्द्रहास
© चन्द्रहास
श्रावणाच्या कुशीत दडलेल्या
सरींनो खुशाल बरसा तुम्ही।
किती वर्षांनी वर्षा अशी ही
सख्यानो बरसून जा मुक्त तुम्ही।।1
सरींनो खुशाल बरसा तुम्ही।
किती वर्षांनी वर्षा अशी ही
सख्यानो बरसून जा मुक्त तुम्ही।।1
गीतनभातून चित्तस्वरांच्या
लयी होऊन बरसा तुम्ही।
चुकलेले ठेके काळजाचे
समेत लावून परता तुम्ही।।2
लयी होऊन बरसा तुम्ही।
चुकलेले ठेके काळजाचे
समेत लावून परता तुम्ही।।2
हळूवार या तुम्ही अलगद या
या स्वप्न उराशी लेऊन तुम्ही।
मृद्गंधाने गंधित दुनिया करण्या
अप्सरा स्वर्लोकातल्या तुम्ही।।3
या स्वप्न उराशी लेऊन तुम्ही।
मृद्गंधाने गंधित दुनिया करण्या
अप्सरा स्वर्लोकातल्या तुम्ही।।3
एवढेच करा पण तुम्हां विनंती ही
उपकार म्हणोनि बरसा हों तुम्ही।
अपकार अपघात न व्हावा कोठेही
राधेच्या स्नेहल नजरेसम व्हा तुम्ही।।4
उपकार म्हणोनि बरसा हों तुम्ही।
अपकार अपघात न व्हावा कोठेही
राधेच्या स्नेहल नजरेसम व्हा तुम्ही।।4
नाजूक साजूक प्रवाही तुम्ही धारा
सोबतीस तुमच्या सखा गार वारा।
चाल तुमची जणु तिरप्या हो नजरा
या केशरी कळ्यांचा माळून हो गजरा॥5
सोबतीस तुमच्या सखा गार वारा।
चाल तुमची जणु तिरप्या हो नजरा
या केशरी कळ्यांचा माळून हो गजरा॥5
No comments:
Post a Comment