Tuesday, 27 April 2021

आपल्या घरी, घरी घरातच रहा.

आपल्या घरी, घरी घरातच रहा.
© चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर 

हरवलाय मैत्रीचा कडक चहा
घरीच एकमेकांकडे एकटक पहा
घर सारखं सारखं आवरत रहा
आपल्या घरी, घरी घरातच रहा.

ऑनलाईनचे तास वाढलेत
ऑनस्क्रीनचे त्रास वाढलेत
काढ्यांवर दिवस काढलेत
व्हाॅटसॅपवरचे संदेश पहा.
आपल्या घरी, घरी घरातच रहा.

रटाळवाण्या त्या सिरिअल्स
बातम्या तर अति सिरिअस
होऊन एक नंबरचे क्युरिअस
फेसबुक ट्विटर उघडून पहा
आपल्या घरी, घरी घरातच रहा.

टिफिनचं काय घेऊन बसलात
फिलिंग शेअरींगच कमी झालंय.
 शेअरींगचं काय घेऊन बसलात
 फिलिंगच तर कमी झालंय पहा.
 आपल्या घरी, घरी घरातच रहा.

ती करते रोज नवा पदार्थ खायला
तो आपला आहेच लुडबुड करायला 
कंटाळलो आता सारखं हात धुवायला
खिडकीतून शून्य रस्ता तरी पहा
आपल्या घरी, घरी घरातच रहा.

घुमतात सतत सायरनचे आवाज
रटाळ चाललंय घरून कामकाज
आरशातच करावा स्वतःवर नाझ
वजन वाढलंय की उतरलंय पहा
आपल्या घरी, घरी घरातच रहा.

(कविता कवीच्या नामोल्लेखासह पुढे पाठवू शकता.)
 



Sunday, 14 October 2018

"आई, मज तूच तू दिसशी"

"आई, मज तूच तू दिसशी"

करंगळी तू हाती धरीशी
आई मज, हिताशी नेईशी

जिकडे पहावे तिकडे आई
मज तूच अन तूच दिसशी
नाही अन्य तत्त्व जाणिवेशी
आई, मज तूच तू दिसशी

स्वर्णकान्ती तुझी झळकती
सिंहावर तू आरूढ झालीशी
हाती आयुध बहु तू धरीशी
आई, मज तूच तू दिसशी

नाही भिती नाही चिंता उराशी
नाही तमा, नाही भीड कोणाशी
किती सुंदर तू माते हसशी
आई, मज तूच तू दिसशी

नाही मागणे काही या जगाशी
हिशेब नाही बाकी जगाशी
तू कल्पवल्ली, मी तुजपाशी
आई, मज तूच तू दिसशी

समजावून नाही समज कोणाशी
जन अडकून बैसती पाशाशी
नाही तुझी कृपा, माये तयापाशी
आई, मज तूच तू दिसशी

अर्पावे शीरकमल तुझे पायाशी
घेशी लेकरां कवटाळुन हृदयाशी
नको विस्मर, रेणुके क्षणाशी
आई, मज तूच तू दिसशी

‍‍‌卐 चन्द्रहास卐

Sunday, 28 January 2018

नामाची गोडी

नामाची गोडी
© चन्द्रहास।

ओवाळूनी टाकावे जन्म हजार
नामाची गोडी त्याहूनी अपार।
सुखाचे उत्सव, दुःखाचे उत्सव
करीतसे माझा हा पंढरीराव।।

जळे पाप सारे, होता गुरुभेट
भवसागरी बेट, विठोबा माझा।
करावे तयाचे भजन रात्रंदिनी
मन होय विशुद्ध संतचरणी।।
जय श्रीकृष्ण!

कृपा लाभतां...

कृपा लाभतां...
© चन्द्रहासः।

करीशी मना सांग चिंता कशाला
तुझी काळजी वाहण्या ती समर्था।
जगाची असे पालिका एकवीरा
तिचे पादपद्मी तुझा रे निवारा॥

नसे वा असे वा दुजे अन्य कोणी
परी माय सांभाळिते लेकरासी।
कितीदा जरी चूक केलीस तू रे
करीते क्षमा ती तुला लेकरासी॥

अगाधाचि लीला तिची काय वर्णू
असे याचकां माय ती कामधेनू।
तिला मागता व्यर्थ ना होतसे रे
तिचे पादपद्मी तुझे लाड सारे॥

जगाची असे स्वामिनी अंबिका ती
तिचे नाम ते सर्वदुःखान्तकारी।
तिचे नाम ते सर्वभीत्यन्तकारी
तिचे नाम घेई सुखां पात्र होई॥

तिचे नाम घेतां रिपू दूर जाई
तिचे नाम घेतां जगी मान्य होई।
तिचे नाम घेतां स्वये लाभ येई
तिचे नाम घेतां स्वये स्वस्ति होई॥

कृपा लाभतां नाम ओठात येई
कृपा लाभतां नाम चित्तात येई।
कृपा लाभतां सिद्धि कार्यात येई
कृपा लाभतां हास तो धन्य होई॥

Saturday, 2 December 2017

पग भूमी पर, ऐसे व्योम बनो।

पग भूमी पर, ऐसे व्योम बनो।
© चन्द्रहास शास्त्री

निर्लज्ज नही, निर्मम नही
निरालस बनो सदा।
निर्जन नही, निर्दय नही
निरागस बनो सदा।।

स्वार्थ नही; सीमित स्वार्थ पाप है।
बहती नदी बनो, ठहरा जल नही।।
विस्तीर्ण हृदय हो जिसका सहज
चट्टान भी लांघता है  वही ।।

आंधी नही, तुफान नही
इक प्यारासा पवन बनो।
सैलाब नही, अकाल नही
इक प्यारासा पर्जन्य बनो।।

किस शाक पर कौन पंछी बैठा है
मित्रो, निश्चित कोई नही जानता है ।
अंतर से उस का मनोहर ध्वनि सुनो
भाषा नही पर भाव समझ आता है।।

अहंकार नही, हुंकार बनो
पाञ्चजन्य के समान बनो।
उत्कर्ष के नये आयाम बनो
पग भूमी पर, ऐसे व्योम बनो।।

निरन्तर रुके बिना थके बिना,
ध्येयपथ पर सदा चलते रहो।
जगद्गुरु है परमात्मा कल्याणकारी
उन पर अटल भरौसा करते रहो।।

जय श्रीकृष्ण!
चन्द्रहासः।

Saturday, 21 October 2017

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस
© चन्द्रहास।

कुठेही गेलो आपण जगात;
मन आपलं तिथेच असतं.
याचं खरं कारण सांगू?
आपलं विश्व तिथेच असतं.

परतीचा पाऊस, अंधारलेला दिवस
कासावीस होतो तेव्हा जीव
कारण मनानं कधीच; होय, कधीच
ओलांडलेली नसते ती शीव

ना विसरता येतं ते डबा खाणं
कट्ट्यावरचं आपलं चहा पिणं
दाट धुक्यात सूचलेली ती कवणं
अन एकमेकांना हास हास हसवणं

NSB मधील सर्व Friendsना समर्पित...

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...