Sunday, 23 April 2023

पुस्तकावरचं प्रेम चंद्रहास सोनपेठकर

 पुस्तकावरचं प्रेम 

हासरा चंद्र 


अनेकदा अनेक पुस्तकं 

बेटर असतात.

आणि पुस्तकातली 

लेटर्स बेस्ट असतात.


काही शंका असेल,

तर विचारू शकता.

समजलंच नसेल,

तर पोगो पाहू शकता.


पुस्तकावर प्रेम करा

लेटर्सवरही प्रेम करा.

पुस्तक देणा-यावरसुद्धा

मनापासून प्रेम करा.


पुस्तकातून लेटर 

देणा-यावर प्रेम करा.

पुस्तकाएवढं लेटर

लिहिणा-यावर प्रेम करा.


पुस्तकाच्या कव्हरवर

रेखाटलेल्या स्टारवर

फिदा होऊन मनभर

चल पुढे पुढे 'लव'कर 


प्रेम म्हणजे समर्पण,

संयम आणि नियंत्रण. 

हे सारं समजून घेऊन

सार्थ ठरतं प्रेम करणं.

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...