Monday, 1 May 2017

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

© डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर

इथे थोर राजे तसे थोर संत
सुभक्ती सुशक्ती निराळीच माती।
इथे आसमंती निनादे मृदंग
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे ज्ञान विज्ञानरूपी पताका
इथे दिव्य ओव्या नि गाथा नि दिंड्या।
इथे पेटती संक्रमाच्या मशाली
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे देव जाते दळायास येई
इथे देव पाणी भरायास येई।
इथे देव लेकूरवाळाचि होई
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

मराठीत बोला मराठीस वंदा
मनी मान ठेवा भगव्या ध्वजाचा।
कवी चंद्रहासां सदा वंद्य माता
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

(वृत्त: भुजंगप्रयात)

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...