Monday, 8 May 2017

हरीचे असावे।

 

 

हरीचे असावे।

डॉ. चन्द्रहास सोनपेठकर 







मुखी नाम माझ्या हरीचे असावे
हरीच्या विना चित्त कोठे नसावे।
हरीच्या पुढे हात जोडून पुन्हा
हरीसीच मागे हरीचे असावे॥1॥

तहानेस भूकेस न म्या स्मरावे
सदा सर्वदा चित्त पायी रमावे।
क्षणांच्या सवे नाम देवा घडावे
कणां अंतरी मी हरीला पहावे॥2॥

इथेही तिथेही कुठेही कधीही
धरे अंतरी गंध जैसा वसे हो।
मुखी नाम माझ्या मनी ध्यान माझ्या
असावे हरीचे सदा सर्वदा हो॥3॥

हरी देत आहे तरी काय चिन्ता
सखा राधिकेचा असे सर्वदाता।
मला पामराला हवे काय आता
मिळे सर्व काही विना मागता हो॥4॥

हरीच्या गुणां काय वर्णू कसे मी
निराकार ते रूप साकार नामी।
हरी वाजवी वेणु भक्तां समोरी
नमस्कार माझा मनेकायवाची॥5॥

हरी स्वप्न दावी हरीचीच सत्ता
हरी मुक्तिदाता हरी भुक्तिदाता।
नमस्कार कान्हा पुरस्कार कान्हा
नको विस्मरू हो हरी चन्द्रहासां ॥6॥

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...