भूकच खरी।
© चन्द्रहास
क्षणभर मलाही वाटलं,
वाटू नयेत आपट्याची पानं.
थांबवावी आपण वृक्षतोड
वाटावं सद्विचारांच सोनं.
पण भूकेल्या लहान मुलाची
आर्त किंकाळी ऐकली.
"दादा घ्या की हो सोनं"
हाक भिडली पार हृदयाशी.
"पानं नको पैसे घे" असं म्हणालो,
ते लेकरू नाही ना झालं तयार.
मग पर्यावरणवादालाच म्हणालो,
वादा, भूकेपुढे तू हारच स्वीकार
chhanch!!
ReplyDeleteThanks!
Delete