Saturday, 29 October 2016

विस्मयित

विस्मयित
© चन्द्रहास सोनपेठकर
माझाच हासरा चेहरा पाहताना
विस्मयित होतो मी पुन्हा चालताना।।
कुणी रोविले काटे वाटेत बोचरे
कुणी दाविले बेमौसमी मोहरे।
कुणी देईले गंधाळले मोगरे
कुणी भारीले श्वास नवा घेताना।।
वंदित येऊन गंधित झालो
गर्दीत पूरता विसरून गेलो।
माझे मीपण हरवून बसलो
मुरलीधराला शरण जाताना।।
उपकार कुणाचे मानावे कळेना
मन पुन्हा मागे वळता वळेना।
दिव्यत्वाची प्रचीती पाहताना
गुणाकार सुखाचा सवें हासताना।।

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...