|| जय जय हे परशुराम भगवान ||
जय जय हे परशुराम भगवान
आरती करीतो आम्ही भाग्यवान
जय जय हे परशुराम भगवान
कलियुगात या सकलां तारावे
देवा तुम्ही आता सकला तारावे
चिरंजीव तुम्ही देवा प्रकटावे
करावे जीवन न्यायधर्मनीतिवान
जय जय हे परशुराम भगवान
आरती करीतो आम्ही भाग्यवान
तुम्ही अन्यायां मोडून काढीता
रणात ऐसा पराक्रम दाविता
नियंता त्राता तुम्ही अमुचे देवा
करावे जीवन विजयकीर्तीमान
जय जय हे परशुराम भगवान
आरती करीतो आम्ही भाग्यवान
जगदंबेच्या पोटी घेऊनी अवतार
करीता तुम्ही जगताचा उद्धार
खळांसी भय वाटे ऐकूनी टणत्कार
करावे जीवन निर्भयबुद्धीमान
जय जय हे परशुराम भगवान
आरती करीतो आम्ही भाग्यवान
चन्द्रहास पायी ठेवी मस्तक आदरे
शरण येती देवा तुम्हा सर्व ही लेकूरे
राखावे देवा तुम्ही आता मानसन्मान
जय जय जय हे परशुराम भगवान
आरती करीतो आम्ही भाग्यवान

No comments:
Post a Comment